हा या वर्षातील ९२ वा (लीप वर्षातील ९३ वा) दिवस आहे.
सर्वाधिक प्रवास करणारा भारतीय कोण असावा असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा. राकेश शर्मा यांनी सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन पृथ्वीला १८ प्रदक्षिणा घातल्या. यातील प्रत्येक प्रदक्षिणा साधारण २ कोटी, १९ लाख ८० हजार किलोमीटरची होती. नंतर १९९७ मधे कल्पना चावलाने हा विक्रम मोडला. |  |
महत्त्वाच्या घटना:
२०११ | : | क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय |
१९९८ | : | कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला. |
१९९० | : | स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना |
१९८९ | : | ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन |
१९८४ | : | सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता. |
१९८२ | : | फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली. |
१८७० | : | गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मूळ ’पुणे सार्वजनिक सभा’ आणि ’बाँम्बे असोसिएशन’ या संस्थांमध्ये आहे असे मानले जाते. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९४४ | : | अजय देवगण – अभिनेता |
१९२६ | : | सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९७९) |
१९०२ | : | बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या ’याद पियाकी आये’, ’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत. (मृत्यू: २५ एप्रिल १९६८ - हैदराबाद, तेलंगण) |
१८९८ | : | हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत. (मृत्यू: २३ जून१९९० - मुंबई, महाराष्ट्र) |
१८७५ | : | वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४०) |
१८०५ | : | हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू: ४ ऑगस्ट १८७५) |
१६१८ | : | फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ डिसेंबर१६६३) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००९ | : | गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म: ८ जून १९१७) |
२००५ | : | पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म: १८ मे १९२०) |
१९९२ | : | आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते (जन्म: ? ? ????) |
१९३३ | : | के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात. (जन्म: १० सप्टेंबर १८७२) |
१८७२ | : | सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल१७९१)
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा