दिनविशेष : १ एप्रिल : एप्रिल फूल दिवस
हा या वर्षातील ९१ वा (लीप वर्षातील ९२ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२००४ | : | ’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली. |
---|---|---|
१९९० | : | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्न’ |
१९७३ | : | कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली. |
१९५७ | : | भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला. |
१९५५ | : | गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती. |
१९३६ | : | ओरिसा राज्याची स्थापना झाली. |
१९३५ | : | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. |
१९३३ | : | भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण |
१९२८ | : | पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे. |
१८८७ | : | मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली. |
१६६९ | : | उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९४१ | : | अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज |
---|---|---|
१९३६ | : | तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री |
१९१२ | : | पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८) |
१८८९ | : | डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू:२१ जून १९४०) |
१८१५ | : | ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू: ३० जुलै १८९८) |
१६२१ | : | गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५) |
१५७८ | : | विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (मृत्यू: ३ जून १६५७) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२०१२ | : | एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१) |
---|---|---|
२००६ | : | राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (जन्म: ११ डिसेंबर १९२५) |
२००३ | : | प्रकाश घांग्रेकर – गायक व नट (जन्म: ? ? ????) |
२००० | : | संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६) |
१९९९ | : | श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? १९१५) |
१९८९ | : | श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४) |
१९८४ | : | पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ४ एप्रिल १९०२ - कोल्हापूर, महाराष्ट्र) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा