Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

शुक्रवार, २५ मार्च, २०१६



हा या वर्षातील ८५ वा (लीप वर्षातील ८६ वा) दिवस आहे.
  • बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
       जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याने सुमारे ७० लाख ज्यू लोकांची कत्तल केली. ज्यू ही जमात भूतलावरुनच नष्ट करण्याचा त्याचा निश्चय होता. यामुळे ज्यूंच्या मनात हिटलरविषयी पराकोटिचा द्वेष आहे. या द्वेषापोटी हिब्रू भाषेत ’ह’ हे मूळाक्षर असुनही ज्यू लोक त्याचा उच्‍चार करण्याचे टाळतात. त्याऐवजी ते ’ख’ म्हणतात!

महत्त्वाच्या घटना:

२०१३:त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना
२०००:ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९७९:अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या
१९७४:गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात.
१९७२:नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
१९४२:इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह
१९४२:ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.
१९१०:लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला.
१९०२:नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.
१५५२:गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८५:प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
१९०९:बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)
१९०७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
१८७५:सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५)
१८७४:रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२:माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्धीपराङमुख गीतकार व कवी (जन्म: १० मे १९४०)
२००८:बाबुराव बागूल – दलित साहित्यिक (जन्म: १७ जुलै १९३०)
२००३:गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या (जन्म: ? ? ????)
१९९९:आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म: ११ डिसेंबर १९४२)
१९९७:नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म: ९ सप्टेंबर१९१०)
१९९६:के. के. हेब्बर – चित्रकार (जन्म: ? ? १९११)
१९९६:डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
१८२७:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा