Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

गुरुवार, २४ मार्च, २०१६



हा या वर्षातील ८४ वा (लीप वर्षातील ८५ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०१३:मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना
२०१३:मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना
२०००:१७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
१९९७:जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९२९:लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१८९८:शिवरामपंत परांजपे यांचे ’काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.
१६५५:क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६:मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
१९४७:सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
१९३३:वसंत गोवारीकर – शास्त्रज्ञ
१९३२:वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (मृत्यू: २६ जून २००१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९३:मधुकर केचे – साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२)
१९९१:वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
१९७५:फैसल – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: ? एप्रिल १९०६)
१९४०:’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (जन्म: ११ डिसेंबर १८६७)

गरुड आणि घुबड

द्वारे अनंत दळवी | प्रकाशक संपादक मंडळ | ८ जुलै २००६
गरुड आणि घुबड | Garud Aani Ghubad
‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’
तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

1 टिप्पणी:

  1. इयत्ता ११ वी ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा होणार आहे. त्यातील MCQ प्रश्नांचा सराव करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा:
    https://www.patwardhanclass.com/10/10-CET-2021.php

    उत्तर द्याहटवा