दिनविशेष : ३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस
हा या वर्षातील ८९ वा (लीप वर्षातील ९० वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
१९४४ | : | दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला. |
---|---|---|
१९२९ | : | भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली. |
१८५६ | : | पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले. |
१८४२ | : | अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला. |
१७२९ | : | थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. [चैत्र शु. १२] |
१६६५ | : | पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला [चैत्र व. ९] |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९४२ | : | वसंत आबाजी डहाके – भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी |
---|---|---|
१९०८ | : | देविका राणी – अभिनेत्री (मृत्यू: ९ मार्च १९९४) |
१९०६ | : | जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५) |
१८९९ | : | शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०) |
१८९५ | : | निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५) |
१८५३ | : | व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (मृत्यू: २९ जुलै १८९०) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००२ | : | आनंद बक्षी – गीतकार (जन्म: २१ जुलै १९२०) |
---|---|---|
१९८९ | : | गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक (जन्म: २४ सप्टेंबर १९२२) |
१९७६ | : | रघुवीर मूळगावकर – चित्रकार (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८) |
१९६९ | : | वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (जन्म: २६ जुलै १८९४) |
१९५२ | : | जिग्मे वांगचुक – भूतानचे २ रे राजे (जन्म: ? ? १९०५) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा