Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

बुधवार, २२ जून, २०१६



हा या वर्षातील १७४ वा (लीप वर्षातील १७५ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९८:दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
१९९६:आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्‍या महिला पंतप्रधान होत.
१९७९:इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
१८९४:पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.
१७५७:प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२:झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू
१९१६:सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)
१९१२:अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (मृत्यू: ७ जुन १९५४)
१९०६:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (मृत्यू: १३ मार्च १९५५)
१९०१:राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ आक्टोबर १९२१)
१९९४:वसंत शांतारम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार (जन्म: ? ? ????)
१९९०:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्यायहरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत. (जन्म: २ एप्रिल१८९८ - हैदराबाद, आंध्र प्रदेश)
१९८२:बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन (जन्म: ? ? ????)
१९८०:व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (जन्म: १० ऑगस्ट १८९४)
१९८०:राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन (जन्म:१४ डिसेंबर १९४६)
१९५३:डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै१९०१)
१९३९:गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर१८८५ - चितल, अमरेलीगुजराथ)
१८३६:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)
१७६१:बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (जन्म: ८ डिसेंबर १७२१)
००७९:व्हेस्पासियन – रोमन सम्राट (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा