दिनविशेष : २१ जून : जागतिक संगीत दिन
हा या वर्षातील १७२ वा (लीप वर्षातील १७३ वा) दिवस आहे.
- हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस असतो.
- महाकवी कालिदास जयंती [आषाढ शुद्ध प्रतिपदा]
महत्त्वाच्या घटना:
| २००६ | : | नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले. |
|---|---|---|
| १९९९ | : | विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला. |
| १९९८ | : | फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला. |
| १९९५ | : | पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला. |
| १९९२ | : | विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर |
| १९९१ | : | भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली. |
| १९६१ | : | अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले. |
| १९४९ | : | राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना |
| १९४८ | : | पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे |
| १८९८ | : | अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला. |
| १७८८ | : | न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
| १९५३ | : | बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७) |
|---|---|---|
| १९५२ | : | जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू |
| १९२३ | : | सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२) |
| १९१६ | : | सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू: २१ जानेवारी १९९८) |
| १९०५ | : | जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
| २०१२ | : | भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७) |
|---|---|---|
| २००३ | : | लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४) |
| १९८४ | : | मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५) |
| १९७० | : | सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ जून १९०१) |
| १९४० | : | डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म:१ एप्रिल १८८९) |
| १९२८ | : | द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. (जन्म: ३ एप्रिल १८८२) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा