Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६



हा या वर्षातील ११३ वा (लीप वर्षातील ११४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९०:नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
१८१८:दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८:एस. जानकी – शास्त्रीय गायिका
१८९७:लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)
१८७३:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४)
१८५८:पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू:५ एप्रिल १९२२)
१८५८:मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)
१७९१:जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ जून १८६८)
१५६४:विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३:शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९)
२००७:बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
२००१:जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक (जन्म: १२ आक्टोबर १९२१)
२०००:मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन (जन्म: ? ? ????)
१९९७:डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ’गोल्डन बॉय’ (जन्म: २३ मे १९१८)
१९९२:सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१)
१९२६:हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (जन्म: २३ डिसेंबर १८५४)
१९८६:जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)
१९५८:शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (जन्म: १० आक्टोबर १८७१)
१८५०:विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (जन्म: ७ एप्रिल १७७०)
१६१६:विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा