हा या वर्षातील १११ वा (लीप वर्षातील ११२ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
| २००० | : | आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. |
| १९९७ | : | भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती. |
| १९७२ | : | ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
| ???? | : | उपेन्द्र भट – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक |
| १९३४ | : | डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक |
| १९५० | : | शिवाजी साटम – अभिनेते |
| १९२६ | : | एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो. |
| १९२२ | : | अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७) |
| १८६४ | : | मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जून १९२०) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
| २०१३ | : | शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९) |
| १९५२ | : | सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (जन्म: २४ एप्रिल १८८९) |
| १९४६ | : | जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३) |
| १९३८ | : | सर मुहम्मद इक्बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (जन्म: ९ नोव्हेंबर१८७७) |
| १९१० | : | मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (जन्म: ३० नोव्हेंबर१८३५) |
| १५०९ | : | हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जानेवारी १४५७)
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा