Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

सोमवार, ११ एप्रिल, २०१६



हा या वर्षातील १०२ वा (लीप वर्षातील १०३ वा) दिवस आहे.
       ’कुस्ती’ हा मूळ फारसी शब्द असून, त्याचा अर्थ झोंबी असा आहे. भारतात फार पुर्वीपासून कुस्ती लोकप्रिय आहे. थॉमस ब्राऊटन या इंग्रज सेनाधिकार्‍याने केलेल्या नोंदीनुसार पेशव्यांच्या काळात स्त्रियाही कुस्तीत रस घेत होत्या. वस्तादाकडून शिक्षण घेऊन या कुस्तीगीर महिला खेडोपाडी तिथल्या पैलवानांना आव्हान देत फिरत असत.कुस्ती

महत्त्वाच्या घटना:

१९९८:गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान
१९९७:पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.
१९९७:पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर
१९६७:कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६१:रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.
१९४५:अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
१९३५:[चैत्र शुद्ध प्रतिपदा - बलिप्रतिपदा] ’प्रभात’चा ’चंद्रसेना’ हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.
१६०६:ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५४:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (मृत्यू: २ जानेवारी १९८९)
????:सुभाष अवचट - चित्रकार
१९४३:सुमित्रा महाजन – केंद्रीय मंत्री
१९३२:लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)
१९१७:विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: २१ ऑगस्ट१९७८)
१९१४:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – ’सासरमाहेर’, ’भाऊबीज’, ’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१०:पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)
१८७१:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार. त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते. (मृत्यू: २ फेब्रुवारी१९३०)
१३८२:मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग [चैत्र व. ९]
ख्रिस्तपूर्व ५९९ महावीर – जैनांचे २४ वे तीर्थंकर (मृत्यू: ख्रिस्तपूर्व ५४९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म: २४ एप्रिल १९२९)
२००१:भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे ऑस्ट्रेलियात निधन (जन्म: १० ऑगस्ट १९६०)
२००१:पै. चंबा मुत्‍नाळ – हिंदकेसरी (जन्म: ? ? ????)
१९४५:फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० जानेवारी १८८२)
१९०६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१८१७:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २६ जून १७३०)
१७२०:बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म: १ जानेवारी १६६२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा