पृष्ठे

महत्वाचे शासन निर्णय

सम्पर्क फॉर्म भरा

शिक्षक उपयोगी महिती

बुधवार, ३० मार्च, २०१६



हा या वर्षातील ९० वा (लीप वर्षातील ९१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१:सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
१९७०:१२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
१९६६:रशियाने ’ल्यूना-१०’ हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
१९६४:मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९०१:पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
१८८९:आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
१८६७:डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१६६५:मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८:शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री
१८७१:’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० जुलै १९६०)
१८६५:आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (मृत्यू: २७ फेब्रुवारी१८८७)
१८४३:बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
१५९६:रेनें देंकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
१५१९:हेन्‍री (दुसरा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० जुलै १५५९)
१५०४:गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (मृत्यू: २८ मार्च १५५२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४:गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
२००४:तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
१९७२:महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
१९१३:जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (जन्म: १७ एप्रिल १८३७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा