पृष्ठे

महत्वाचे शासन निर्णय

सम्पर्क फॉर्म भरा

शिक्षक उपयोगी महिती

मंगळवार, २९ मार्च, २०१६



हा या वर्षातील ८९ वा (लीप वर्षातील ९० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९४४:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९२९:भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१८५६:पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१८४२:अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१७२९:थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. [चैत्र शु. १२]
१६६५:पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला [चैत्र व. ९]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४२:वसंत आबाजी डहाके – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी
१९०८:देविका राणी – अभिनेत्री (मृत्यू: ९ मार्च १९९४)
१९०६:जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)
१८९९:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)
१८९५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)
१८५३:व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (मृत्यू: २९ जुलै १८९०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२:आनंद बक्षी – गीतकार (जन्म: २१ जुलै १९२०)
१९८९:गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)
१९७६:रघुवीर मूळगावकर – चित्रकार (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
१९६९:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (जन्म: २६ जुलै १८९४)
१९५२:जिग्मे वांगचुक – भूतानचे २ रे राजे (जन्म: ? ? १९०५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा