पृष्ठे

महत्वाचे शासन निर्णय

सम्पर्क फॉर्म भरा

शिक्षक उपयोगी महिती

गुरुवार, ३१ मार्च, २०१६



हा या वर्षातील ९१ वा (लीप वर्षातील ९२ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००४:’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली.
१९९०:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’
१९७३:कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.
१९५७:भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.
१९५५:गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९३६:ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९३५:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.
१९३३:भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण
१९२८:पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.
१८८७:मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१६६९:उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४१:अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज
१९३६:तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री
१९१२:पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)
१८८९:डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू:२१ जून १९४०)
१८१५:ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू: ३० जुलै १८९८)
१६२१:गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)
१५७८:विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (मृत्यू: ३ जून १६५७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२:एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१)
२००६:राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (जन्म: ११ डिसेंबर १९२५)
२००३:प्रकाश घांग्रेकर – गायक व नट (जन्म: ? ? ????)
२०००:संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)
१९९९:श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? १९१५)
१९८९:श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
१९८४:पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ४ एप्रिल १९०२ - कोल्हापूर, महाराष्ट्र)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा