पृष्ठे

महत्वाचे शासन निर्णय

सम्पर्क फॉर्म भरा

शिक्षक उपयोगी महिती

शुक्रवार, १७ जून, २०१६



हा या वर्षातील १७२ वा (लीप वर्षातील १७३ वा) दिवस आहे.
  • हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस असतो.
  • महाकवी कालिदास जयंती [आषाढ शुद्ध प्रतिपदा]

महत्त्वाच्या घटना:

२००६:नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.
१९९९:विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.
१९९८:फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.
१९९५:पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९२:विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर
१९९१:भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.
१९६१:अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९४९:राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना
१९४८:पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे
१८९८:अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.
१७८८:न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३:बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)
१९५२:जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९२३:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)
१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू: २१ जानेवारी १९९८)
१९०५:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)
२००३:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)
१९८४:मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)
१९७०:सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ जून १९०१)
१९४०:डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म:१ एप्रिल १८८९)
१९२८:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा